*नाईचाकुर येथे महायुतीची विजय निर्धार काॅर्नर बैठक; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
२४० उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ आज दि.06 रोजी नाईचाकुर येथे काॅर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस सभेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी माजी खासदार प्रा रवींद्र गायकवाड साहेब, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जितेंद्र दादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा संपन्न झाली.यावेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नाईचाकुर गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण उत्साहात संपन्न झाले. आणि महायुतीच्या विजयाचा निर्धार नव्याने दृढ करण्यात आला. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीची बांधिलकी आणि विकासाचा संकल्प या सभेमध्ये पुन्हा अधोरेखित करण्यात आला. आगामी निवडणुकीत मतदारांचा पाठिंबा मिळवून उमरगा मतदारसंघात प्रगतीचा नवा अध्याय सुरू करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य गोविंद पवार, विठ्ठल साई साखर कारखाना मुरूम संचालक केशव पवार, रावसाहेब पवार गुरुजी, माजी सरपंच शेषेराव माधवराव पवार, माणिक बापू पवार,भाजपाचे शरद पवार, सिद्धेश्वर माने, सतीश पवार, संजय पवार, प्रदीप पवार, सिद्धू पवार, बी.के.पवार ,माजी सरपंच नामदेव पवार ,रशीद शेख, संभाजी नागसेन, व्यंकट घहिवाळे, राम पाटील, गुणवंत पवार, शरद पवार ,तानाजी साहेब ,बालाजी पवार ,गोविंद गावडे, अर्जुन पवार, प्रसाद पवार, संतोष पाटील ,दिलीप ठाकूर ,डॉ.तानाजी शिंदे, राजू इटूबोणे ,अरुण पवार बाळासाहेब पवार, दिलीप गायकवाड, यावेळी शिवसेना मागासवर्गीय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश समन्वयक अँड.वैजनाथ आडसकर, शेखर महाराज, व्यकट पाटील, आदी उपस्थित होते.