

धाराशिव: सांजा जिल्हा परिषद मतदारसंघातील शेकापूर गावातील स्वामी समर्थ मंदिरामध्ये महिला बचत गटाची बैठक उत्साहात पार पडली. जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार नितीन (बप्पा) शेरखाने यांच्या उपस्थितीमुळे ही बैठक विशेष ठरली. भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रीतीताई कदम, बुथ प्रमुख औदुंबर तात्या यादव, नितीन लगदिवे, संतोष क्षीरसागर आणि जयपाल शेरखाने यांचा ग्रामस्थ आणि महिला गट सदस्यांकडून मान्यवर सत्कार करण्यात आला.
बैठकीत महिलांनी घरगुती, सामाजिक व शासकीय योजनांशी संबंधित विविध प्रश्न मांडले. पाणीपुरवठा, दिवसभरातील सुरक्षितता, बचत गटाच्या कर्जप्रश्नांपासून गावातील सुविधा सुधारण्यासाठी लागणाऱ्या मागण्या यावर सविस्तर चर्चा झाली. उपस्थित पदाधिकारी व शेरखाने यांनी सर्व प्रश्न शांतपणे ऐकून तातडीने उत्तरं दिली तसेच काही मुद्द्यांवर त्वरित मार्ग काढून दिला. नितीन शेरखाने यांनी, “महिलांची सबलीकरण हीच गावाच्या विकासाची खरी वाट. शेकापूरच्या महिलांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगत पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याची ग्वाही दिली.
या बैठकीमुळे शेकापूर परिसरातील राजकीय वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.


