Sunday, February 1, 2026

Epaper

spot_img

धाराशिव येथे आ. राणादादांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम; प्रदीप शिंदें यांच्याकडून मतीमंद शाळेत फळ वाटप 

धाराशिव: भारतीय जनता पार्टीचे नेते, ‘मित्रा’ चे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी पंस उपसभापती प्रदीप उर्फ पप्पू शिंदे यांनी सामाजिक उपक्रम राबविला. आ. राणादादांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री शिंदे यांच्या वतीने धाराशिव येथील स्वाधार मतीमंद केंद्रात फळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व कौतुक होत आहे. 

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे लोकाभिमुख आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा परंपरेचा’ अनोखा देखावा धाराशिवमध्ये पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप (पप्पू) शिंदे यांनी धाराशिव येथील स्वआधार मतिमंद मुलींच्या निवासी शाळेत भेट देत फळवाटप करून आमदार राणादादांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी मोहन कुलकर्णी, नामदेव नायकल, तसेच संस्थेचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींची उपस्थिती होती. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा गजर आणि सेवाभावाने भारलेले वातावरण यामुळे कार्यक्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

हाच आमचा सेवा मार्ग 

राणादादांच्या नेतृत्वाखाली सेवा आणि विकासाचा जो दीप उजळला आहे, त्याच प्रकाशात आम्ही समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. वाढदिवस साजरा करण्याचा हा आमचा ‘सेवा मार्ग’ आहे.

प्रदीप शिंदे 

जिल्हा सरचिटणीस-भाजप

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी