Wednesday, February 4, 2026

Epaper

spot_img

भाजपच्या मल्हार पाटलांचे ठाकरे गटाला धक्के सुरूच; अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

धाराशिव: भारतीय जनता पार्टीच्या खंबीर नेतृत्वावर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकासाभिमुख राजकारणावर विश्वास ठेवत देवकते गल्ली येथील उबाठा गटातील तरुणांची मोठी फळी आज भाजपात दाखल झाली. शहराच्या प्रगतीसाठी भक्कम नेतृत्वाची गरज ओळखून तरुण कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश करून भाजपाची शक्ती अधिक दृढ केली.

प्रवेश करणाऱ्यांमध्ये श्री. रवी देवकते व श्री. शिवम देवकते यांच्यासह श्री. संतोष ठवरे, श्री. गणेश देवकते, श्री. अमोल धुमाळ, श्री. संदीप देवकते, श्री. अरबाज खान, श्री. साहिल शेख, श्री. परविन देवकते, श्री. निखिल सोलंकर, श्री. शुभम कोळेकर, श्री. आदित्य गोडवे, श्री. रोहित देवकते, श्री. शंभो निंबाळकर, श्री. समर्थ देवकते, श्री. सोहम कोळेकर, श्री. अभिजित आंबेकर आणि श्री. अनिकेत नाईक या तरुणांचा समावेश आहे. भाजपाच्या सर्वसमावेशक कार्यपद्धती, विकासदृष्टी आणि जनतेशी निगडित भूमिकेमुळे या तरुणांनी पक्षाची वाट निवडली आहे. पक्ष प्रवेशासाठी श्री. दिनेश बंडगर यांनी विशेष पुढाकार घेतला. या नव्या ऊर्जेमुळे भाजपाचे संघटन अधिक सक्षम होईल आणि धाराशिव शहराच्या विकासाच्या प्रवासाला नवी गती मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी