Saturday, January 31, 2026

Epaper

spot_img

भाजप उमेदवारांना विजयी करून तुळजापूरच्या सर्वांगीण प्रगतीला गती द्या- आ. राणाजगजितसिंह पाटील

भाजप उमेदवारांना विजयी करून तुळजापूरच्या सर्वांगीण प्रगतीला गती द्या- आ. राणाजगजितसिंह पाटील
तुळजापूर येथे भाजपच्या कॉर्नर सभेस दांडगा प्रतिसाद
तुळजापूर: भाजपने तुळजापूरच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबवले आहेत. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या धाराशिव–तुळजापूर रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, महायुती सरकारने या प्रकल्पासाठी ३२९५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच, तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकासासाठी १८०० कोटींचे ऐतिहासिक बजेट मंजूर करण्यात आले असून, प्रकल्प जलदगतीने सुरू आहेत. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.४ मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेला मोठ्या संख्येने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सभेला उपस्थित राहून नागरिकांनी पक्षाच्या विकासात्मक धोरणांना पाठिंबा दर्शविला. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. विनोद (पिटू) गंगणे, प्रभाग क्र.४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार श्री. सुनील रोचकरी आणि सौ. श्वेता वैभव साळुंके यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नागरिकांनी केले. अनेक सामाजिक संघटनांनी आपल्या उमेदवारांना दिलेल्या समर्थनासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त केले. सभेत उपस्थित नेत्यांमध्ये आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची गती दिसून आली. या कार्यक्रमात भाजपा पक्षाचे वरिष्ठ नेते आणि प्रभागातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामध्ये श्री. अनिल काळे, श्री. संतोष परमेश्वर, श्री. आनंद कंदले, श्री. सचिन रोचकरी, श्री. विशाल रोचकरी, श्री. अविनाश गंगणे, श्री. शांताराम पेंदे, श्री. शिवाजी बोधले यांचा समावेश होता. पुढे बोलताना आ. राणादादा म्हणाले, भाजपने तुळजापूरच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबवले आहेत. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या धाराशिव–तुळजापूर रेल्वे प्रकल्पाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून, महायुती सरकारने या प्रकल्पासाठी ३२९५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तसेच, तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकासासाठी १८०० कोटींचे ऐतिहासिक बजेट मंजूर करण्यात आले असून, प्रकल्प जलदगतीने सुरू आहेत. भाजपने नागरिकांचे उत्पन्न वाढवणे, शहराचा कायापालट करणे आणि तुळजापूरला विकासाच्या नव्या उंचीवर नेणे ही ठाम बांधिलकी दर्शवली आहे. प्रचार सभेत उपस्थित नागरिकांच्या वाढत्या विश्वास आणि अपेक्षांचा उल्लेख करत भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी