Saturday, January 31, 2026

Epaper

spot_img

संदीप भैय्या, वैशालीताई तुम आगे बढो..भाजपचे इंगळे, सोनवणे यांचा झंझावात; गाटी-भेटीसह जनसंपर्कावर मोठा भर.!


धाराशिव: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी चालविली आहे. धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार संदीप इंगळे व वैशालीताई सोनवणे यांनी मतदारांच्या गाठी-भेटीसह जनसंपर्कावर मोठा भर दिला आहे. स्थानिक मतदारसंघात गाठी-भेटी, संवाद व थेट जनसंपर्क या माध्यमातून दोघांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केल्याचे चित्र आहे. इंगळे आणि सोनवणे यांनी उमेदवारीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच झंझावात सुरू केल्याने वातावरण ढवळून निघाले आहे.

धाराशिव नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याने प्रचाराचा आखाडा आता पेटणार आहे. धाराशिव शहरातील सर्वाधिक चुरशीचा प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपाने जोरदार फिल्डींग लावली आहे. या प्रभागात निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेले उमेदवार संदीप इंगळे व वैशालीताई सोनवणे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते तथा ‘मित्रा’ चे उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निरीक्षक नितीन भोसले यांच्या उपस्थितीत श्री इंगळे व सौ. सोनवणे यांनी घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील राजकारणाचे चित्र पालटून टाकले आहे. स्थानिक समस्या, विकास कामं आणि नागरिकांच्या अपेक्षा जाणून घेत इंगळे–सोनवणे यांनी विश्वासाचा पाया अधिक मजबूत केला आहे. “विकास हीच आमची ओळख, आणि जनतेचा विश्वास हीच आमची जिंकणारी ताकद,” असा ठाम संदेश या जोडीने दिला आहे. या झपाट्याने चाललेल्या प्रचार मोहिमेमुळे विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि तरुण कार्यकर्त्यांचा जोश यामुळे इंगळे–सोनवणे यांनी पॉझिटिव्ह वातावरण निर्माण केले आहे. घराघरात भेटी देत, स्थानिक समस्या ऐकत व नागरिकांशी आत्मीय संवाद साधत इंगळे-सोनवणे हे  लोकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहेत. त्यांच्या संवादशैलीतली प्रांजळता आणि प्रत्येक मतदाराशी जोडणारा व्यक्तिगत संपर्क हे या मोहिमेचं वैशिष्ट्य ठरत आहे. संपूर्ण प्रभागात झपाट्याने चाललेल्या संपर्क मोहिमेमुळे विरोधकांच्या गोटातही हालचाल सुरू झाली असून, तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता इंगळे-सोनवणे यांचा प्रचार झंझावाती वेग घेत आहे.

जनतेचा विश्वास हीच आमची ताकद
आमचे नेते, आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. या प्रभागात निवडणूक लढवण्यासाठी मी आणि वैशालीताई सोनवणे इच्छुक आहोत. गत पाच वर्षापासून या प्रभागात मी जनतेची सेवा करत आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. त्यामुळे “जनतेचं प्रेम आणि विश्वास हीच आमची ताकद,” आहे ‌.

संदीप गौतमराव इंगळे
इच्छुक उमेदवार, भाजप


जनतेचा विश्वास सार्थ ठरवणारा
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू आहे. प्रभाग क्रमांक तीनमध्ये निवडणूक लढण्यासाठी मी इच्छुक आहे. प्रभागातील जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी निवडणूक लढविणार आहे. संधी दिल्यास  आ. राणा दादा आणि जनतेचा विश्वास सार्थ ठरविणार.

वैशालीताई सोनवणे
इच्छुक उमेदवार, भाजप

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी