Saturday, January 31, 2026

Epaper

spot_img

बेंबळी गटातून आ. राणादादांचे निष्ठावंत सरपंच भगीरथ लोमटे यांच्या नावाची जोरदार चर्चा; उमेदवारी मिळणार?

धाराशिव: आगामी  जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय समीकरणे रंगू लागली आहेत. बेंबळी जिल्हा परिषद मतदारसंघ यावेळी सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या मतदारसंघासाठी विविध पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांपैकी एक असलेले सरपंच भगीरथ लोमटे यांच्या नावाची या गटातून उमेदवारीसाठी जोरदार चर्चा सुरू आहे. श्री लोमटे हे आ. राणादादा यांचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, राणा दादा युवा प्रतिष्ठानचे ते तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तर सध्या रुईभर नगरीचे विद्यमान सरपंच असून त्यांनी जनसंपर्कासह विविध विकास कामांवर भर दिला आहे. त्यामुळे भगीरथ लोमटे यांना एकनिष्ठतेचे उमेदवारी स्वरूपात फळ मिळणार का? याकडे समर्थक, कार्यकर्त्यांसह जनतेचे लक्ष वेधले आहे.

बेंबळी जिल्हा परिषद मतदार संघ हा जिल्ह्यात सर्वाधिक  चुरशीचा आणि लक्षवेधी मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघातील लढती या कायम अटी-तटीचा राहिल्या आहेत. या मतदारसंघात रूईभर, बेंबळी, बरमगाव, वाडी, आंबेवाडी, गौडगाव, अनसुर्डा, विठ्ठलवाडी, शिवाजीनगर, महादेववाडी, खामसवाडीसह पंचगव्हाण या गावांचा समावेश आहे. या गटात उमेदवारी मिळावी, यासाठी इच्छुक उमेदवारांनी नेते मंडळींकडे जाऊन ‘मी उमेदवारीसाठी इच्छुक’ आहे, अशी इच्छा व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी काळात उमेदवारीसाठी जबरदस्त रस्सीखेच होणार आहे. बेंबळी जिल्हा परिषद गटातून रुईभर नगरीचे विद्यमान सरपंच भगीरथ लोमटे यांचे नाव भाजपाच्या गोटातून आघाडीवर असल्याची महिती आहे. श्री लोमटे हे भारतीय जनता पार्टीचे नेते, ‘मित्रा’ चे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. श्री लोमटे हे सुरूवातीला राणादादा युवा प्रतिष्ठानचे रुईभर शाखाध्यक्ष, प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष, रूईभर ग्रामपंचायत सदस्य एक टर्म, दुसरी टर्म पाच वर्ष उपसरपंच याच कार्यकाळात प्रभारी सरपंच म्हणून यशस्वी कारभार केला. त्यानंतर ग्रामपंचायत विरोधात गेल्यानंतर श्री लोमटे यांनी पुन्हा सदस्य म्हणून पाच वर्ष काम पाहिले. विरोधात असतानाही त्यांनी गोर-गरीब जनतेची कामे करून आपला जनसंपर्क कायम ठेवला. त्यानंतर सरपंच पदाच्या आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्याने ग्रामस्थांच्या मागणीनंतर त्यांनी सौभाग्यवतींना निवडणुकीमध्ये उतरवले. भगीरथ लोमटे यांच्या जनसंपर्क आणि गोर-गरीब जनतेचे काम करण्याची तळमळ पाहून त्यांनी सौ. लोमटे यांना निवडून दिले. थेट जनतेतून त्या महिला सरपंच ठरल्या. आ. राणाजगजितसिंह पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना भगीरथ लोमटे हे राणा दादा युवा प्रतिष्ठानचे धाराशिव तालुकाध्यक्ष होते. रुईभर ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. हा प्रवास छोटासा वाटत असला तरी भगीरथ लोमटे यांनी संघर्षामधून आपल्या पक्षाचे आणि नेत्याचे प्रमाणिकपणे कार्य केले असून ते आजही सुरू आहे. निवडणूक कोणतीही का असेना, आपल्या पक्षाने आणि नेत्याने जो आदेश दिला त्याचे पालन श्री लोमटे यांच्याकडून करण्यात आले. रुईभर गावात विविध विकासकामे करून त्यांनी अनेक अडी-अडचणी कायमस्वरूपी मिटविल्या आहेत. माता-भगिणी असो की वडीलळधारी मंडळी सर्वांशी आपुलकीने वागूण त्यांच्या अडी-अडचणीचे सोडविण्याचे काम भगीरथ लोमटे यांनी केले आहे. भगीरथ लोमटे यांनी गेल्या काही वर्षांत गावाच्या विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्यांची लोकाभिमुख नेतृत्व म्हणून मजबूत छाप पडली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, शेतकऱ्यांसाठी उपक्रम, ग्रामस्वच्छता अशा अनेक कामांमुळे रूईभर ग्रामपंचायतीचा विशेष उल्लेख केला जातो.  या सर्व कामांच्या पाठीशी राणादादांचे मार्गदर्शन व लोमटे यांचे नेतृत्व ठळकपणे दिसते. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये “या वेळी राणादादांचा खरा कार्यकर्ता संधीचा हक्कदार आहे” अशी भावना दिसत आहे. स्थानिक स्तरावर राणादादांच्या निष्ठावंतांच्या गटातून लोमटे यांच्या उमेदवारीला पसंती मिळत आहे. पक्षांतर्गत चर्चेनुसार, बेंबळी गटात भगीरथ लोमटे हे संघटनात सक्रिय, जनतेत लोकप्रिय आणि राणादादांशी थेट संपर्कात असलेले नेतृत्व आहे. त्यामुळे ही चर्चा फक्त अफवा न राहता उमेदवारीच्या दिशेने पहिले पाऊल ठरू शकते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. दरम्यान, गटात इतर दावेदारांचेही हालचाली सुरू असल्या तरी कार्यकर्त्यांचा कल “राणादादांचा माणूस म्हणजे भगीरथ लोमटे” अशा स्पष्ट भूमिकेकडे झुकताना दिसतो आहे. आता भाजपची अधिकृत यादी जाहीर होताच या चर्चेला मुर्त रूप मिळते का, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. 

संघटनातील वाटचाल

लोमटे यांनी राणा दादा युवा प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष, रुईभर शाखाध्यक्ष म्हणून कार्य केले. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, प्रभारी सरपंच या पदांवर काम करताना जनतेच्या विश्वासाचे बंध मजबूत केले. ग्रामपंचायतीत विरोधात राहूनही त्यांनी गोरगरीबांच्या समस्या सोडवत जनसंपर्क कायम ठेवला.

🔹 गावविकासात पुढाकार

भगीरथ लोमटे यांच्या नेतृत्वाखाली रुईभर ग्रामपंचायतीत पायाभूत सुविधा, स्वच्छता, आणि शेतकरीहिताचे उपक्रम राबवले गेले. त्यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन आणि सर्व समाजघटकांशी आपुलकीने वागण्याची शैली यामुळे त्यांची लोकाभिमुख नेते म्हणून ओळख निर्माण झाली आहे.

🔹 भाजप गोटात ‘राणादादांचा माणूस’ चर्चेत

पक्षांतर्गत चर्चेनुसार, लोमटे हे संघटनात सक्रिय, जनतेत लोकप्रिय आणि राणादादांशी थेट संपर्कात असलेले नेतृत्व मानले जाते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये “या वेळी राणादादांचा खरा कार्यकर्ता संधीचा हक्कदार आहे” अशी भावना व्यक्त होत आहे.

🔹 मतदारसंघाचे महत्त्व

बेंबळी जिल्हा परिषद मतदारसंघात रूईभर, बेंबळी, बरमगाव, वाडी, आंबेवाडी, गौडगाव, अनसुर्डा, विठ्ठलवाडी, शिवाजीनगर, महादेववाडी, खामसवाडी व पंचगव्हाण या गावांचा समावेश आहे. हा मतदारसंघ नेहमीच चुरशीचा राहिला असून या वेळीही रस्सीखेच रंगणार हे निश्चित आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी