
दारफळ: धाराशिव तालुक्यातील दारफळ गावात घडलेल्या गॅस सिलेंडर स्फोटात किसन दासा घुटे यांच्या घराचे व सर्व वस्तूंचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर गावभर हळहळ व्यक्त होत असतानाच भाजपचे युवा नेते तथा भावी जिल्हा परिषद सदस्य रोहित पडवळ यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत माणुसकीचा आदर्श घालून दिला.
रोहित पडवळ यांनी कुटुंबाची विचारपूस करून आपल्या परीने आर्थिक मदत केली तसेच या संकटाच्या काळात मानसिक आधार दिला. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, समाजात सकारात्मकतेचा संदेश पसरला आहे. यावेळी सरपंच रवींद्र जाधव, माजी सरपंच बलभीम जाधव, पंचायत समिती सदस्य आश्रुबा माळी, पोलीस पाटील सचिन जाधव, नाना इंगळे, श्रीनिवास घुटे, संजय पवार, बालाजी सुरवसे, संताजी पडवळ आदींसह उपस्थित उपस्थित होते.


