*धाराशिवः राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे पालकमंत्री झाल्यापासून काही जणांच्या पोटात ‘राजकीय कावीळ’ झाली आहे. त्यात एकदिवशीय स्वीय सहाय्यक राहिलेल्या एकाने बदनामीसाठी नवा ‘श्रध्दा’ पॅटर्न ‘नांद’ विण्यास सुरुवात केली आहे. ओएसडी, माजी आमदारासह पीएला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आपल्या गोधडीतून रंगविलेल्या चर्चा बाहेर काढल्या आहेत. एक दिवसाची स्वीय सहाय्यकाची ऑर्डर निघाली आणि रद्दही झाल्याने या तत्कालीन ‘पीए’ ची मळमळ बाहेर पडू लागली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी लोकप्रतिनिधीनी सुचविलेली कामे आणि ग्रामपंचायत, नगर पालिका, सार्वजनिक बांधकाम विभागांसह विविध यंत्रणांनी दिलेल्या प्रस्तावांना मंजूर दिली. जिल्ह्यात समप्रमाणात निधी मिळेल, यासाठी ना. सरनाईक यांनी प्रयत्न चालविला. मात्र सर्व सुरळीत होत असल्याचे पाहून या एक दिवसीय तत्कालीन ‘पीए’मधील खुजली जागी झाली. स्वत: रंगविलेल्या चर्चेला ‘हवा’ देत मग बदनामीचा नवा ‘श्रद्धा’ पॅटर्न ‘नांद’ विल्याचे म्हटले जात आहे.
राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे पारदर्शक कारभार करणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. राजकीय जोडे बाजूला ठेवून गोर-गरिब, सर्वसामान्य कार्यकर्ते, नेते व पदाधिकाऱ्यांना सामावून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. धाराशिव जिल्ह्याचा सर्वागिण विकास करण्यासाठी त्यांनी जिल्हा नियोजन समितीसाठी वाढीव निधीही मंजूर करून आणला. सन 2024-25 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीचा निधी वाटपात त्यांनी समतोल राखल्याचे म्हटले जात आहे. धाराशिव, तुळजापूर, कळंब, भूम, परंडा, वाशी, उमरगा व लोहारा या तालुक्यातही कोट्यवधी रुपयांच्या निधीचे ‘गिफ्ट’ दिले. सत्ताधा-यांसह विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींकडून याद्या मागवून कामेही मंजूर केली. ग्रामपंचायत कोणत्या पक्षाची आहे. हे न पाहता त्या गावासाठी विकासकामे गरजेचे असल्याचे पाहिले. मात्र चांगल्या माणसाच्या वाटेत ‘काटे’ टाकले जातात, असे म्हटले जाते, त्याप्रमाणे ना. सरनाईक यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून अनेकांना ‘राजकीय कावीळ’ झाली आहे. हे कमी की काय एक दिवसाची स्वीय सहाय्यकाची ऑर्डर काढून रद्द केलेल्या एका तत्कालीन ‘पीए’ ने बदनामीचा नवा ‘श्रद्धा’ पॅटर्नचा बेत आखल्याची चर्चा आहे. स्वतः रचलेल्या चर्चा घडवून हा तात्कालीन पीए शिंतोडे उठविण्यासाठी पडद्याआडून ‘वळवळ’ करत आहे. पीए करावे, यासाठी अनेकांची दारे या व्यक्तीने झिजवली आहेत. मात्र पालकमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक पदाची जबाबदारी मिळाली नाही, याची खदखद या पीएला चांगलीच सतावत आहे. कोण विचारत नसल्याने या एक दिवसीय पीएने मग बदनामीचे जाळे टाकत उपद्रवी मुल्य दाखविण्यास सुरुवात केल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. काही नेत्यांजवळ जात हा पीए स्वतःच रंगविलेल्या चर्चांचे सादरीकरण करून पालकमंत्री, माजी आमदार, पीएसह ओएसडींची प्रतिमा मलिण करत असल्याचीही चर्चा आहे. मात्र आपण जे बदनामीचे कांड करत आहोत, हे कोणालाच माहिती नाही, असे त्या तत्कालीन पीएला वाटत असले तरी संपूर्ण जिल्ह्यात त्याच्या नावाची चर्चा आहे. चुकीची माहिती सांगून आपलं खोटं पुराण खरं कसे आहे, हे पटवून देत आहे. विशेष म्हणजे या तत्कालीन पीएने एका पालकमंत्र्यांजवळ असताना ‘टोल’ घेवून ‘माया’ जमविल्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर झाल्यानेच त्याला स्वीय सहाय्यक पद मिळाले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे स्वतःला स्वीय सहाय्यक पदाची जबाबदारी न मिळाल्याने ही तत्कालीन पीएची खदखद बाहेर पडत आहे. मात्र या तत्कालीन पीएचे अनेक कारनामे आता चर्चिले जात असून अनेक नेत्यांनीही त्याचे रंग पाहिल्याचे म्हटले जात आहे. मात्र केवळ स्वत:ला स्वीय सहाय्यक पद मिळाले नाही, म्हणून चुकीची चर्चा घडवून बदनामी करणाऱ्यांना पदाधिकारी, कार्यकर्ते व जनताही चांगलीच ओळखून आहे.
एक दिवसाचा पीए ते बदनामीचा मास्टरमाईंड.!
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा स्वीय सहाय्यक म्हणून या व्यक्तीची ऑर्डर काढण्यात आली होती. मात्र या महाशयाचे अनेक ‘काळे’ नामे कानावर आल्याने काढलेली ऑर्डर रद्द करण्यात आली. हिरमोड झालेल्या या तथाकथित पीएने मग बदनामीचे षडयंत्र ‘नांद’विण्यासाठी अयशस्वी ‘श्रद्धा’ पॅटर्न राबविला. काही चुकीची चर्चा पसरवून संभ्रमही निर्माण केला. मात्र स्वतःला स्वतःच्या कारनाम्यामुळे स्वीय सहाय्यक पद मिळाले नाही, म्हणून पालकमंत्री, माजी आमदार, पीए, ओएसडींसह प्रशासनाच्या बदनामीचा ‘खेळ’ कशासाठी? अशी चर्चा आता रंगू लागल्या आहेत.
स्वार्थ साधून ‘श्रद्धा’ ‘नांद’विणारा.!
पालकमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक पद न मिळाल्याने या पीएचा चांगलाच हिरमोड झाला. अनेक प्रयत्न करूनही यश आले नाही. हा तत्कालीन पीए म्हणजे संधी साधून ‘श्रद्धा’ ‘नांद’ विणारा असल्याची चर्चा आहे. जो पालकमंत्री येणार आहे, त्यांच्याकडे कोणत्या ना कोणत्या मार्गाने पोहचून स्वीय सहाय्यकाची खुर्ची मिळविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मात्र ना. सरनाईकांनी त्याला थारा न दिल्याने त्याची ‘मळमळ’ आता बाहेर येऊन बदनामीचे षडयंत्र करत असल्याची जोरदार चर्चा आहे.
बदनामीचे जाणीपूर्वक शिंतोडे?
स्वतःला स्वतःच्या कारनाम्यामुळे पद मिळाले नाही. म्हणून पालकमंत्री कार्यालयातील अधिकारी, माजी आमदार, त्यांचे पीए यांच्यावर शिंतोडे उडवून प्रतिमा मलिन करण्यासाठी या तत्कालीन पीएने बदनामीचा डाव टाकला आहे. मात्र हाच पीए एकेकाळी ‘टोल’ गोळा करून कामे देत होता, मात्र आपल्याला स्वीय सहाय्यक केले नाही, म्हणून स्वतः रंगविलेल्या चर्चांना ‘हवा’ देत आता पालकमंत्री कार्यालयातील अधिकारी, माजी आमदार, पीएंसह प्रशासनाला बदनाम करण्याचा आटापिटा करत असल्याची चर्चा आहे.