Tuesday, April 15, 2025

Epaper

spot_img

वाघोली-शिंदेवाडी येथे गुरुवारी श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण सोहळा 

वाघोली-शिंदेवाडी येथे गुरुवारी श्री स्वामी समर्थ मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, कलशारोहण सोहळा

धाराशिव:अनंत कोटी, ब्रम्हांडनायक, राजाधिराज, योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांचे वाघोली व शिंदेवाडी (ता.जि. धाराशिव) येथे भव्य-दिव्य मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्यानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत सप्ताह सोहळा होत असून महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा होणार आहे. या सोहळ्यास पंचक्रोशीतील भाविक-भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वाघोली-सारोळा व शिंदेवाडी येथील ग्रामस्थ व भाविकांनी केले आहे.

धाराशिव तालुक्यातील वाघोली-शिंदेवाडी गावच्या सिमेवर अनंत कोटी, ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भव्य-दिव्य मंदिर साकारण्यात आले आहे. गावातील तरुण व स्वामी भक्तांनी एकत्र येत दोन वर्षांपूर्वी वाघोली पाटी जवळ समर्थांचे मंदिर उभारण्याचा संकल्प केला होता. हा संकल्प पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी तरुण, नागरिक व स्वामी भक्तांनी अहोरात्र परिश्रम घेतले. अखेर श्री स्वामी समर्थ महाराज यांचे प्रचंड भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे. श्री महाकालेश्वर, श्री विठ्ठल रुक्मिणी, विश्व माऊली ज्ञानोबाराय, वैराग्य महामेरु श्री संत गोरोबा काका यांच्यासह संतांच्या आशीर्वादाने याठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्तीप्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा संपन्न होणार आहे. यानिमित्त दि. २६ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत हा भव्य-दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा होणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण ह.भ.प. शांतीब्रह्म मारुती बाबा कु-हेकर महाराज (आळंदी) व गोपालक रामायणाचार्य ह.भ.प. संजय महाराज पाचकोर (अकोला) यांच्या शुभहस्ते गुरूवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी ६ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे. त्यानंतर ह.भ.प. संजय पाचपोर महाराज यांची ११ ते १ या वेळेत किर्तन सेवा होणार आहे. श्री शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा होणार असून कथा प्रवक्ते ह.भ.प. देवगोपाल शास्त्री (जळगाव) असणार आहेत. तर संगीत संयोजक ह.भ.प. राजूतात्या दवंगे (कोपरगाव), तबला वादक ह.भ.प. भारती महाराज (बारामती) सिन्थ वादक ह.म.प. आकाश महाराज (जळगाव), पॅड ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज (जळगाव) तर झांकी ह.भ.प. राकेश महाराज पाटील (जळगाव) हे असणार आहेत. पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णुसहस्त्रनाम, ८ ते ११ गुरुचरीत्र पारायण, ११ ते १ गाथा भजन, १ ते २श्री स्वामी समर्थ नाम दिन कार्यक्रम २ ते ५ श्रीशिवमहापुराण कथा, सावं. ५ ते ६ हरिपाठ, ७ ते ९ हरिकिर्तन, रात्री ९ ते १० भोजन, १० ते ४ पंचक्रोशीतील भजणी मंडळाचे सामुदायीक भजन होणार आहे. २६ मार्च रोजी ह.भ.प. भागवताचार्य आत्माराम शास्त्री महाराज (आळंदी देवाची), २७ मार्चला ह.भ.प. आत्माराम महाराज कुटे (अध्यापकः जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी), २८ मार्च रोजी भजनसम्राट ह.भ.प.पुरुषोत्तम पाटील महाराज (बुलढाणा), २९ मार्च रोजी ह.भ.प. विनोदाचार्य ज्ञानेश्वर माऊली पटाडे महाराज (अहिल्यानगर), दि. ३० मार्च रोजी ह.भ.प. वेदांतचार्य लक्ष्मण महाराज चव्हाण (सोलापूर), ३१ मार्च रोजी ह.भ.प. श्रीगुरु कान्होबा महाराज देहूकर (पंढरपूर), १ एप्रिल रोजी

ह.भ.प. श्री व्दाराचार्य महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर (नाशिक) तर ह.भ.प. गुरुवर्य संदीपान महाराज हासेगावकर (अध्यक्ष/परिक्षकः जोग महाराज वारकरी शि. संस्था, आळंदी) यांची सुश्राव्य कीर्तन सेवा होणार आहे. तरी याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

नामवंत कीर्तनकारांची होणार सेवा

सप्ताह कालावधीत आत्माराम शास्त्री महाराज (आळंदी देवाची), ह.भ.प. आत्माराम महाराज कुटे (अध्यापकः जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी), भजनसम्राट ह.भ.प.पुरुषोत्तम पाटील महाराज (बुलढाणा), ह.भ.प. विनोदाचार्य ज्ञानेश्वर माऊली पटाडे महाराज (अहिल्यानगर), ह.भ.प. वेदांतचार्य लक्ष्मण महाराज चव्हाण (सोलापूर), ह.भ.प. श्रीगुरु कान्होबा महाराज देहूकर (पंढरपूर), ह.भ.प. श्री व्दाराचार्य महामंडलेश्वर डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर (नाशिक) व ह.भ.प. गुरुवर्य संदीपान महाराज हासेगावकर (अध्यक्ष/परिक्षकः जोग महाराज वारकरी शि. संस्था, आळंदी) यांची कीर्तन सेवा होणार आहे.

 

यांची राहणार प्रमुख उपस्थिती

 

ह.भ.प. अमर महाराज, ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री (उत्तराखंड), ह. भ.प. एकनाथ महाराज,

ह.भ.प. स्वामी महेशानंद महाराज, ह.भ.प. अँड. गजानन दगडू चौगुले, ह.भ.प. अनिल महाराज पाटील-बाभळगांवकर, ह.भ.प. नवनाथ महाराज चिखलीकर, ह.भ.प. किशनगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

अशी आहे समर्थांची मूर्ती

श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिर गाभाऱ्यात श्री स्वामी समर्थांची पंचधातूपासून साकारण्यात आलेली सुंदर अशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या मूर्तीची सव्वा तीन फूट उंची असून पुणे येथे ती बनविण्या

त आली आहे.

 

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी