धाराशिव: अल्पावधीत वृत्तपत्र क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेल्या दैनिक ‘धाराशिव नामा’ च्या तुळजापूर तालुका प्रतिनिधीपदी सोमनाथ रंगनाथ पुजारी (रा.तुळजापूर) यांची रविवारी (दि.२) नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल श्री पुजारी यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
धाराशिव येथे दैनिक ‘धाराशिव नामा’ च्या मुख्य कार्यालयात संपादक विनोद बाकले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सोमनाथ पुजारी यांचा सत्कार करण्यात आला. अन्याय, अत्याचारावर प्रहार आणि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, कृषीसह विविध क्षेत्रातील घडामोडी वाचक, नागरिकांसमोर आणण्यासाठी आपण कार्य करावे असे आवाहन करून मुख्य संपादक विनोद बाकले यांनी श्री पुजारी यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या
.