मुंबई: महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली असून मुंबई येथील आझाद मैदानावर आज शाही शपथविधी सोहळा पार पडला. यानिमित्त मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने आई तुळजाभवानी देविजींची मानाची कवड्याची माळ देवून यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. राजाभाऊ राऊत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.