ढोकी येथे आज मनसेची जाहीर सभा
धाराशिव: उस्मानाबाद- कळंब मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार देवदत्त मोरे यांच्या प्रचारार्थ ढोकी (ता. धाराशिव) येथे आज (दि.१३) सायंकाळी ७ वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मनसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे यांना मनसेने उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातून आखाड्यात उतरविले आहे. गावो-गाव मोरे यांनी विखुरलेल्या कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोट बांधत प्रचाराची धुराळा उडविला आहे. विशेष म्हणजे गावोगावी देवदत्त मोरे यांना नागरिकांमधून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान देवदत्त मोरे यांच्या प्रचारार्थ धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे तोफ धडाडणार आहे. ढोकी येथील सोसायटी मैदान समोर ही सभा होत आहे. या सभेस देवदत्त मोरे हे संबोधित करणार आहेत. तरी उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे