परंडा येथे तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या जाहीर सभा
परंडा: भूम-परंडा -वाशी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय, रयत क्रांती संघटना, लहुजी शक्ती सेना व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ उद्या दि.०८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी परंडा, भूम व वाशी तालुक्यातील महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, व मतदार बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
परंडा शहरातील कोटला मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी महायुतीचे नेते व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. परंडा मतदार संघाचे माहितीचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तानाजीराव सावंत यांनी गुरुवारी (दि.७) सभा स्थळ मैदानाची पाहणी करून विविध सूचना केल्या. यावेळी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या सभेस पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. भूम, परंडा व वाशी तालुकयातील महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, व मतदार बंधु भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.