कास्ती येथील माजी सरपंचांसह कार्यकर्ते शिवसेनेत दाखल; आ. चौगुले यांच्या हस्ते सत्कार करून प्रवेश
लोहारा: उमरगा-लोहारा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेना पक्षात सामील होत आहेत. गावोगावी सुरू असलेल्या संवाद दौऱ्यात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेत दाखल होत आहेत. लोहारा तालुक्यातील कास्ती (खु) येथील माजी सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी आ. चौगुले यांच्या हस्ते प्रवेश केला. या कार्यकर्त्यांना पक्षात योग्य मान-सन्मान व दिला जाईल, अशी ग्वाही श्री. चौगुले यांनी दिली.
कास्ती (खु) येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. माजी सरपंच विलास लक्ष्मण गुंड यांच्या नेतृत्त्वात अनेक युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वांचे शिवसेना पक्षात स्वागत करत येणाऱ्या काळात शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल व शिवसेना पक्ष संघटना बळकट कराल असा विश्वास आ. चौगुले यांनी व्यक्त केला. पक्षप्रवेश केलेल्यांमध्ये माजी सरपंच विलास लक्ष्मण गुंड, नामदेव सुभाष साळुंखे, आण्णाप्पा बंडगर, नारायण हरी साळुंखे, शिवशंकर विलास वकील, नारायण मारुती गुंड, बाळासाहेब केशव सगट, लक्ष्मण रमेश गवळी, महादेव शिवाजी वाघ आदी युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी कास्ती (खू.) सरपंच सागर मन्मथ पाटील, माजी उपसरपंच महेश काशिनाथ पाटील, केसरजवळगा सरपंच अमोल पटवारी, बेलंबचे राजेंद्र कारभारी, गुंजोटी प्रदीप शिवनेचारी, दत्ता डोंगरे, सुरज ईश्वर मगर, राजशेखर चिंचोरे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.