*उमरगा येथे आ.ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्या तोफ धडाडणार!*
उमरगा: लोहारा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आरपीआय, रयत क्रांती संघटना, लहुजी शक्ती सेना व मित्र पक्ष महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले यांच्या प्रचारार्थ उद्या दि.०८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी उमरगा व लोहारा तालुकयातील महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, व मतदार बंधु भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हप्रमुख मोहन पणुरे व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
उमरगा शहरातील जुनी जिल्हा परिषद शाळा, पोलीस स्टेशनच्या बाजुला मेन रोड उमरगा येथे ही सभा होणार आहे. या सभेसाठी माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, जितेंद्र शिंदे, डॉ.चंद्रकांत महाजन, माजी जि.प.सदस्य अभय चालुक्य, युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, माजी जि.प.सदस्य शरण पाटील आदींची उपस्थिती लाभणार आहे. या सभेसाठी उमरगा व लोहारा तालुकयातील महायुतीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, व मतदार बंधु भगिनींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हप्रमुख मोहन पणुरे व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.