Monday, December 23, 2024

Epaper

spot_img

खाण तशी माती..खा.ओमराजेंकडून रणजीत पाटील यांचे कौतुक; फेसबुकवर लिहिली पोस्ट*

*खाण तशी माती..खा.ओमराजेंकडून रणजीत पाटील यांचे कौतुक; फेसबुकवर लिहिली पोस्ट*

परंडा: भूम-परंडा-वाशी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजित पाटील व राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. श्री पाटील यांना राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) तर रणजीत पाटील यांना शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एबी फॉर्म देण्यात आले होते. त्यामुळे या मतदारसंघात मोठा राजकीय पेच निर्माण झाला होता. मात्र रणजित पाटील यांनी शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि राहुल मोटे यांचा मार्ग सुकर झाला. रणजित पाटील यांच्या याच भुमिकेचे ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या फेसबुकवर विशेष पोस्ट लिहून रणजित पाटील यांचे विशेष कौतुक केले आहे.

*ओमराजे यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट*

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळी सकाळी एका पक्षात तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात दिसत आहेत. जो तिकीट देईल तिथे यांची निष्ठा असा बाजार मांडून ठेवलाय. अशा या गलिच्छ राजकारणात आमच्या पक्षातील युवा ज्याला AB फॉर्म दिला गेला होता आणि तो निवडून येणारं हे सगळ्यांना माहिती असताना केवळ आघाडी धर्माचे पालन व्हावे म्हणून उद्धव साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार रणजित ज्ञानेश्वर पाटील याने 1 मिनिट बाकी असताना माघार घेऊन निष्ठेची नवी व्याख्या लिहिली. पक्षाचे निष्ठावंत आमचे नेते माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी कायम उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली. आज त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा रणजित याने त्याच्या वडिलांच्या निष्ठेचा सन्मान करून ती स्वतः सुद्धा जपली. जिथे लोकांना रातोरात आमदार, खासदार व्हायचे आहे यासाठी कितीदा ही पक्ष बदलायची तयारी आहे अशा वेळी रणजित ने केलेला त्याग हा त्याच्या उज्ज्वल भविष्याची ग्वाही देतो. आज रणजित बरोबर मातोश्री ला उद्धव साहेबांची भेट घेतली असता त्यांनी ही रणजित चे मनभरून कौतुक करताना त्याला योग्यवेळी संधी दिली जाईल असा शब्द ही दिला. तसेच तुमच्याकडे उभे असलेले गद्दार यांना निष्ठेची ताकद दाखवा व पराभूत करा असा आदेश देखील मा साहेबांनी आम्हाला दिला. ज्ञानेश्वर पाटील साहेब यांनी कायमच ठाकरे वरील निष्ठा जोपासली आणि रणजित ही त्याच मार्गावर आहे ते म्हणतात ना खाण तशी माती अगदी तसेच. तुझा मोठा भाऊ बनुन रणजित मी कायम तुझ्या बरोबर खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही देतो. तुझा आम्हा सर्वांना खुप अभिमान आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी