वडगाव येथील युवकांचा आमदार चौगुले यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश, शाखाप्रमुखपदी पवार, कार्याध्यक्षपदी साळुंखे यांची नियुक्ती
लोहारा: उमरगा- लोहारा मतदार संघात महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी प्रचारात आघाडी घेतली असून गाव भेट दौऱ्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आ. चौगुले यांनी मतदार संघात केलेल्या विकास कामाच्या जोरावर त्यांनी अनुकूल वातावरण निर्मिती केली आहे. त्यामुळे इतर पक्षातून कार्यकर्ते आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात (शिंदे गट) जाहीर प्रवेश करत आहेत. हा
लोहारा तालुक्यातील वडगाव (गां) येथील तरुण कार्यकर्त्यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. तसेच पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या वडगाव (गां) शाखाप्रमुख पदी सचिन पवार, कार्याध्यक्षपदी कृष्णा हांडे, सहकार्याध्यक्ष व्यंकट साळुंखे, उपशाखाप्रमुख आकाश भुसकांडे, सहसचिव राम पवार, सचिव नागेश फुलसुंदर, अल्पसंख्यांक शाखाप्रमुख फिरोज सय्यद, कोषाध्यक्ष राम दणाने, सुभाष आतकरे, दगडू ( शाम ) पवार, मोहन दणाने, अर्जुन फुलसुंदर, राम दणाने, नागु फुलसुंदर, नामदेव फुलसुंदर, किरण भुजबळ (सोशल मीडिया), कुंडलिक माळी आदींची निवड करण्यात आली. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते नवनियुक्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून शिवसेना पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, राजेंद्र माळी, सरपंच बबन फुलसुंदर, शिवसेना शाखाप्रमुख विलास फुलसुंदर आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.