Monday, December 23, 2024

Epaper

spot_img

परंडा मतदार संघात ना. सावंत यांचा झंझावाती संवाद दौरा; विविध गावात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा मतदार संघात ना. सावंत यांचा झंझावाती संवाद दौरा; विविध गावात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा: भूम परंडा वाशी विधानसभा निवडणूक प्रचारार्थ महायुतीचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचा झंझावाती संवाद दौरे सुरू आहेत. या दौऱ्यास महिलांसह ग्रामस्थांमधून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभत असून ठिकठिकाणी सावंत यांचे जंगी स्वागत करण्यात येत आहे. हा उत्साह व जल्लोष विजयाची नांदी असल्याची प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिली. परंडा तालुक्यातील भोंजा हवेली, कुंभेजा, खानापूर, रुई, दुधी, ढग पिंपरी, आसू, लोणी, नालगाव, शिराळा, वडनेर, देवगाव, कात्राबाद, भोत्र, रोसा, डोमगाव नंबर १, डोमगाव नंबर २, कौडगाव येथे भेट देऊन ना. सावंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना ना. सावंत म्हणाले, भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलेलो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून तिन्ही तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत. याच विकासकामांच्या जोरावर भागातील नागरिकांनी धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून मला पुन्हा एकदा निवडून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (अण्णा) साळुंखे, जिल्हा समन्वयक गौतम लटके सर, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख बालाजी नेटके, शिवसेना तालुका संघटक जयदेव बप्पा गोफणे, नवनाथ मोरे, सुबराव मोरे, मोहन मोरे, पांडुरंग मोरे, बालाजी मोरे, प्रदीप मोरे, ह भ प मांजरे महाराज, गोकुळ चव्हाण, अमोल कांबळे, रवी पाटील,शरद चव्हाण, नाना कोकाटे, पप्पू कोकाटे, भैरू कोकाटे,सोमनाथ कोकाटे, बळीराम कोकाटे, अँड. लक्ष्मण कोकाटे,लक्ष्मण मोरे,कुमार गटकुळ,राजेंद्र कुदळे, ऋषिकेश बारस्कर. योगेश गटकुळ,अप्पा गटकळ, योगेश साबळे, शहाजी कुदळे आदीसह महिला व पुरुष, युवा कार्यकर्ते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी