पंधरा दिवसातच निखळली विक्रमादित्याची कवच कुंडल ! गावचे उपसरपंच, सदस्य तसेच सोसायटी चेअरमन व संचालकांनी सोडली साथ !

Testing is done .Testing is 👍🏼

0
1398

गावचे उपसरपंच, सदस्य तसेच सोसायटी चेअरमन व संचालकांनी सोडली साथ नीलेश लंके यांच्या गोटात डेरेदाखल

पाडळी रांजणगाव : प्रतिनिधी

नीलेश लंके यांच्या माध्यमातून पाडळी रांजणगावमध्ये कोट्यावधी रुपयांची विकास कामे मार्गी लागलेली असतानाही केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी लंके यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात दाखल झालेल्या व त्यानंतर पक्षाच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या विक्रमसिंह कळमकर यांची कवचकुंडले पंधरा दिवसातच त्यांच्या गावातूनच निखळली आहेत !

विक्रमसिंह कळमकर यांनी नीलेश लंके यांची साथ सोडून अजित पवार गटात प्रवेश करण्याचा एकतर्फे निर्णय घेतल्यानंतर त्याचे पडसाद त्यांच्या गाव पातळीवर उमटले. सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी मागणी केल्याप्रमाणे नीलेश लंके यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलेला असतानाही केवळ स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी किंवा यापूर्वी केलेल्या विविध निवडणुकीतील तडजोडीसाठी विक्रमसिंह यांनी कोणालाही विचारात न घेता लंके यांची साथ सोडली. अजित पवार गटात प्रवेश करण्याचा व पर्यायाने तालुक्यातील लोकसभेचे उमेदवार नीलेश लंके यांना विरोध करण्याचा निर्णय घेतला. कळमकर यांनी मागील पंचायत समिती निवडणुकीत पक्षाच्या ध्येय धोरणांना तिलांजली देत अपक्ष उमेदवारी करत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्याचे काम केले होते. पुढे बाजार समितीची निवडणूक तसेच सैनिक बँकेच्या निवडणुकीतही त्यांनी लंके यांच्या सहकाऱ्यांना विरोधात काम केल्याची चर्चा आहे. असे असताना कळमकर यांनी विखे यांना साथ देण्याचा घेतलेला निर्णय त्यांनी यापूर्वी पक्ष विरोधी कारवयांशी सुसंगत असल्याची प्रतिक्रिया गावचे ग्रामस्थ देत आहेत.

दरम्यान, कळमकर यांची भूमिका न पडल्याने शनिवारी नीलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा श्रीगोंदा तालुक्यातील माठ या ठिकाणी आली असता पाडळीच्या ग्रामस्थांनी नीलेश लंके यांची भेट घेतली. तुम्हाला गावातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.

यावेळी पाडळीच्या विद्यमान उपसरपंच वैशाली करंजुले,

सेवा संस्थेचे चेअरमन डी. बी. करंजुले,विठ्ठल साठे, किरण साठे, नितीन साठे, राजू साठे, सदाशिव कळमकर प्रथम करंजुले, गणेश करंजुले, कारभारी पोटघन, सतीश भालेकर आदी उपस्थित होते.

विक्रमला आम्हीच राजकारणात मोठे केले !

आमच्या गावातून कोणी कुठेही कोणत्याही पक्षात प्रवेश केला असला तरी त्यामूळे आपल्या मतदानावर काही फरक पडणार नाही. राजकारणात आम्हीच विक्रमला मोठे केले होते, याची आठवणही ग्रामस्थांनी यावेळी करून दिली.

 

आमचा विश्वासघात केला

म्हाला विश्वासात न घेता चुकीचा विक्रम यांनी निर्णय घेतला. आम्ही या निर्णयाशी विक्रम कळमकर यांच्या सोबत नाही. पाडळी रांजणगावचे स्वाभिमानी ग्रामस्थ लंके साहेबांसोबत कायम राहणार आहेत. तालुक्याचा स्वाभिमान म्हणून त्यांना आम्ही जास्तीत जास्त मताधिक्य देणार आहोत.

विठ्ठल साठे

पाडळीकर संकट काळात साथ सोडत नाहीत

नीलेश लंके यांच्या रूपाने देश स्वतंत्र झाल्यानंतर पारनेर तालुक्याचा प्रथमच खासदार होणार आहे. मतदार संघातील सर्वसामान्य जनता आपल्या माणसाला डोक्यावर घेत असताना घरातले माणसे अमिषाला बळी पडत असतील तर ही संस्कृती सेनापती बापट, अण्णा हजारे यांच्या तालुक्याला कधीही मान्य होणार नाही. पाडळीकर संकट काळात साथ सोडणारे नाहीत तर साथ देणारे म्हणून सदैव स्मरणात राहतील. मताधिक्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

डी.बी.करंजुले

चेअरमन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here