Monday, December 23, 2024

Epaper

spot_img

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; IDBI बँकेत 500 पदांची भरती; पगार महिना 50-55 हजार…

IDBI Bank recruitment 2024 : द इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI) ने IDBI बँक जेएएम भर्ती 2024 साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. या अंतर्गत IDBI बँकेत 500 ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवार 12 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीदरम्यान बँकेच्या अधिकृत साईटवर (idbibank.in) जाऊन अर्ज करू शकता. ही परीक्षा 17 मार्च, 2024 रोजी होईल.

IDBI ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी बँकेने सेट केलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये किमान 55 टक्के गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील पदवी आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा? 
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइट idbibank.in वर जावे. वेबसाइटच्या मेन पेजवर “ऑनलाइन अर्ज करा” अशी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा आणि स्वतःची नोंदणी करा. आता तुम्हाला तुमच्या ईमेलवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल.

आता या लॉगिन आयडी आणि पासवर्डने वेबसाइटवर लॉग इन करा. आता या भरतीसाठी तुमचा अर्ज भरा आणि संपूर्ण तपशील काळजीपूर्वक तपासा. आवश्यक तपशील भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड करा. यानंतर अर्जाची फी भरा. आता तुमचा अर्ज सबमिट करा आणि फॉर्मची प्रिंट आउट घ्या.

अर्ज फी आणि वयोमर्यादा
अर्ज फीबद्दल बोलायचे तर, SC, ST आणि PWD उमेदवारांना 200 रुपये भरावे लागतील, तर इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे असावे, तर कमाल 25 वर्षे ठेवण्यात आली आहे. उमेदवाराचा जन्म 31.01.1999 पूर्वी आणि 31.01.2004 नंतर झालेला नसावा. सरकारी नियमांनुसार, विविध श्रेणींनुसार उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत 10 वर्षांपर्यंत सूट मिळेल

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी