Tuesday, February 3, 2026

Epaper

spot_img

नेता नव्हे… तुमचा रक्ताचा नातलग म्हणून उभा आहे!
उपळा जिल्हा परिषद गट: तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवलात की… माझी सगळी शक्ती वाढते.!”

धाराशिव: जिल्हा परिषदेच्या उपळा गटात माजी पंचायत समिती उपसभापती प्रदीप उर्फ पप्पू (भैय्या) शिंदे यांनी मायबाप जनतेसमोर मनाला भिडणारी, सरळ आणि भावनिक साद घातली आहे. “मी नेता नाही… तुमचा भाऊ, मुलगा आणि कुटुंबातील सदस्य म्हणून तुमच्यासमोर उभा आहे,” या शब्दांनी त्यांच्या संदेशाला मतदारांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

नगर परिषद निवडणुकीनंतर जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर उपळा (मा.) गटात राजकीय तापमान चढू लागले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपाचे एकनिष्ठ आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असलेले प्रदीप (भैय्या) शिंदे ‘निवडणूक लढवायची’ असा निर्धार करून सातत्याने जनसंपर्क वाढवत आहेत. निवडणूक कार्यक्रम घोषित होण्यापूर्वीच त्यांनी मतदारसंघात तब्बल दोन फेऱ्या पूर्ण केल्या असून, समर्थकांकडून उमेदवारीसाठी मोठा दबाव येत आहे. त्यामुळे ते जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरतील, हे जवळपास निश्चित झाल्याचे दिसत आहे. उपळा गटाला कुटुंब संबोधत शिंदे म्हणाले की, निवडणुका येतात आणि जातात पण नाती कायम राहतात. “मी मत मागायला आलो नाही… मी तुमच्यातलाच माणूस म्हणून तुमच्या आशीर्वादाची विनंती करतो,” असे ते भावूक होत म्हणाले. प्रदीप (भैय्या) शिंदे यांचा हा संदेश राजकीय भाषणापेक्षा आपलेपणाचा आणि नातेसंबंध दृढ करणारा असल्याची भावना उपळा गटातील नागरिक व्यक्त करत आहेत.

“मला पुढारी म्हणून मिरवायचं नाही”

शिंदे यांनी आपल्या प्रामाणिक कार्यपद्धतीची आठवण करून देत म्हटले की,
“तुम्ही माझा स्वभाव, माझी निष्ठा ओळखता. माझं लक्ष्य पद नाही… तर तुमच्या सुख-दुःखात धावून येणारा घरचा माणूस राहणं आहे.”

२४ तास उपलब्ध राहण्याचं आश्वासन

उपळा गटातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही अडचणीसाठी अडथळा येऊ नये, यासाठी ते नेहमी तत्पर राहणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.
“तुम्ही माझ्याकडे येताना दुसरा विचार करावा लागणार नाही. मी २४ तास तुमच्यासाठी उपलब्ध असेन,” असे शिंदे म्हणाले.

“तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवलात की… माझी शक्ती वाढते”

आपल्या नात्याची ताकद अधोरेखित करत शिंदे म्हणाले,
“उपळा गट… तुमचं प्रेम हेच माझं बळ, तुमचा विश्वास हेच माझं पद. तुमचा हात माझ्या डोक्यावर ठेवला, की माझी सगळी शक्ती वाढते.”

“मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे”

शेवटी प्रामाणिक विनंती करत शिंदे म्हणाले—
“मी तुमच्यातलाच आहे. आज मला तुमच्या आशीर्वादाची आणि विश्वासाची गरज आहे.  तुम्ही मला मतदानरूपी आशिर्वाद दिले तर मी पाच वर्ष नव्हे आयुष्यभर आपल्या सेवेत तत्पर राहीन, असा विश्वास व्यक्त केला.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी