Monday, December 23, 2024

Epaper

spot_img

प्रा.डॉ.तानाजी सावंत सरांना मतदान का करावे?*

*प्रा.डॉ.तानाजी सावंत सरांना मतदान का करावे?*

डॉ. श्रीमंत कोकाटे

राजसत्ता ही व्यक्तिगत सुखासाठी नसते तर ती लोककल्याणासाठी असते, हे राजकीय तत्त्वज्ञान घेऊन काम करणारे लोकनेते खूप दुर्मिळ झालेले आहेत, अशा काळात आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत सर यांनी आपल्या भूम, परांडा, वाशी मतदारसंघाचा केलेला कायापालट हा महाराष्ट्रासाठी दिशादर्शक असा आहे. डॉ. तानाजी सावंत सर हे अत्यंत दुर्गम भागातून आलेले आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी आपले इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्याच विषयात त्यांनी पीएच.डी. मिळवली. पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरात त्यांनी जेएसपीएम ही शैक्षणिक संस्था स्थापन केली. ज्यामधून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन जगाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. साखर उद्योगांमध्ये त्यांनी क्रांतिकारक काम केले. विशेषता दुष्काळी भागामध्ये पाणी आणि साखर उद्योग याचे त्यांनी जाळे विणले.     सुरुवातीला डॉ. सावंत सर यवतमाळ मतदारसंघातून विधान परिषदेवर गेले. त्यानंतर ते परांडा,भूम, वाशी मतदार संघातून विधानसभेत गेले. भूम, परांडा, वाशी मतदारसंघ म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळी भाग. या तालुक्याला पाणी मिळावे, यासाठी डॉ. सावंत सरांनी 22 हजार कोटी रुपयाचा निधी आणला व तालुक्याला सात टीएमसी पाणी मिळवून दिले.11 हजार 700 कोटी निधी कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेसाठी आणला. तालुक्यातील सर्व तलावामध्ये लिफ्टने पाणी सोडण्यासाठी 1700 शे कोटीचा निधी आणला. धाराशिव जिल्ह्यासाठी सुरुवातीला शंभर कोटी रुपये निधी होता, तो त्यांनी 400 कोटी केला आणि त्यातील 300 कोटी रुपये भूम, परंडा, वाशी तालुक्यासाठी मंजूर केला. तालुक्यातील रस्त्यासाठी त्यांनी 3000 कोटीचा निधी आणला. प्रत्येक गावात स्वतःच्या निधीतून दहा लाख रुपये दिला. त्यांनी महिला बचत गटांना क्रांती उद्योग समूहातून 18 कोटी रुपये बिनव्याजी वाटप केले. प्रत्येक बचत गटांना वैयक्तिक 15000 रुपये निधी दिला. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात सात कोटीचा निधी शाळा, अंगणवाडी आणि अंतर्गत रस्त्यासाठी दिला. धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गावाला स्मशानभूमीसाठी वीस लाख रुपये दिले. मतदार संघातील ग्रामीण भागाला जोडणारे पूल बांधून पूर्ण केले. परंडा आणि भूमला हॉस्पिटल साठी प्रत्येकी 300 कोटी रुपये निधी आणला. भूम येथील एसटी स्टँड साठी 100 कोटी रुपये मंजूर केले.  डॉ. तानाजी सावंत सर हे दिवाळीला आपल्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी 5 किलो साखर देतात, त्यावेळेस ते सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव करत नाहीत. दरवर्षी ते सुमारे 10 कोटीची साखर वाटप करतात. तालुक्यातील लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. दूध संघ, सोयाबीनपासून तेल उत्पादन करणारी कंपनी सुरू करण्याचे नियोजन त्यांनी केलेले आहे. त्यातून शेतीमालाला भाव आणि तरुणांना रोजगार असे त्यांनी पाऊल उचललेले आहे.  डॉ. तानाजी सावंत सर्व स्वतः उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहिती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ते यशस्वी झाले आहेत. काबाडकष्ट करून त्यांनी शिक्षण घेतले, त्यामुळे गरिबीची त्यांना जाणीव आहे. गरिबांची मुलं शिकली पाहिजेत, यासाठी ते शिक्षणाला सढळ हाताने मदत करतात. आपल्या मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांना त्यांनी पाच लाख रुपये किमतीचे इंटरॅक्टिव्ह बोर्ड दिलेले आहेत. प्रत्येक शाळेला सुसज्ज ग्रंथालय आणि मतदार संघातील परांडा, भूम आणि वाशी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वारूढ पुतळे उभे करण्याचा संकल्प डॉ. तानाजी सावंत सरांनी केला आहे.    डॉ. तानाजी सावंत सरांनी कोरोना काळात बार्शी येथे 1000 बेडचे हॉस्पिटल उभारले. ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा केला. राज्यातील अनेक कॅन्सरग्रस्तांना सढळ हाताने मदत केलेली आहे. महात्मा फुले आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून असंख्य रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे. पंढरपूरच्या आषाढी- कार्तिकी वारीसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करून वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. वारकऱ्यांसाठी मोफत महाआरोग्य शिबिर सुरू करणारे प्रा. डॉ. तानाजी सावंत सर महाराष्ट्रातील पहिले आरोग्यमंत्री आहेत. डॉ. सावंत सरांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या सुमारे 60 तरुण मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपये निधी दिला. गरीब मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता आहे. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या तीन धनगर कुटुंबियांना त्यांनी आर्थिक मदत केली. अशा मराठा आणि धनगर आरक्षणसाठी लढणाऱ्या एकूण 105 कुटुंबाना त्यांनी मदत केली. भूम, परंडा, वाशी तालुक्यातील सुमारे 576 निराधार मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था प्रा. डॉ. तानाजी सावंत सर यांनी केलेली आहे. कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव न करता सर्व समाज घटकांना सावंत सर सतत सर्वतोपरी मदत करतात. उच्च शिक्षणासाठी डॉ. तानाजी सावंत सरांनी असंख्य विद्यार्थ्यांना मदत केलेली आहे. आपल्या संस्थेतील अनेक गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कमध्ये सवलत दिलेली आहे.  डॉ. सावंत सरांनी दुष्काळी असणाऱ्या भूम, परंडा, वाशी तालुक्यात पाणी तर आणलेच, त्याबरोबरच सोनारी येथे भैरवनाथ शुगर हा कारखाना उभारला. त्यामुळे शेतकऱ्यांची ससेहोलपट थांबली. वाशी येथील बंद पडलेला शिवशक्ती कारखाना, इंदापूर येथील नरसिंह कारखाना पुनर्जीवित केला. तेरणा कारखाना हा मराठवाड्यातील सर्वात मोठा कारखाना पण गेली बारा वर्षे तो बंद होता. तो डॉ. तानाजी सावंत सर यांनी सुरू केला. मराठवाड्यामध्ये उसाला सर्वाधिक दर देणारे प्रा. डॉ. तानाजी सावंत सर यांचे कारखाने आहेत. दुष्काळी भागाचा कायापालट करणारे प्रा.डॉ. तानाजी सावंत सर हे विकासपुरुष आहेत. अनेक गरजू विद्यार्थी तसेच रुग्ण यांना सढळ हाताने आर्थिक मदत करणारे तानाजी सावंत सर हे दानशूर लोकनेते आहेत. डॉ. तानाजी सावंत सर हे सडेतोड बोलणारे परखड नेते म्हणून प्रसिद्ध आहेत, कर्तृत्ववान, प्रेमळ आणि संवेदनशील नेते हे सडेतोड आणि परखड असतात. ते गोड गोड बोलून जनतेला फसविणारे नेते नाहीत. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाबाबत त्यांच्याकडे आणखीन खूप मोठा दृष्टीकोन आहे. असा विकासप्रिय नेता तालुक्याला लाभला हे तालुक्याचे महाभाग्य आहे.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी