Monday, December 23, 2024

Epaper

spot_img

आ. कैलास पाटील यांच्या निशाण्यावर महायुती सरकार; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून धरले धारेवर.!

 

आ. कैलास पाटील यांच्या निशाण्यावर महायुती सरकार; शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून धरले धारेवर.!

कळंब: शेतकरी देशोधडीला लागला तरी हे सरकार उद्योगपतीचेच हित बघताना दिसत आहे. सोयाबीनचे दर वाढले पण डीओसी आयात करून शेतकऱ्यांपेक्षा यांना कोंबडया महत्वाच्या वाटू लागल्यात आता मत पण कोंबड्यानाच मागा असा टोला आमदार कैलास पाटील यांनी सरकारला लगावला.

धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कैलास पाटील यांनी बारातेवाडी येथे प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी सत्ताधारी महायुती सरकारवर शेतकरी विरोधी धोरणांचा आरोप केला.

आ. पाटील म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्रातील मोदी सरकारने सोयाबीन तेलाची आयात केल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव गडगडले असून, आजचे दर फक्त चार हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

दुधाचे दरही कमी असल्यामुळे पशुधन जोपासणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, असेही त्यांनी सांगितले. महायुती सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, एका बाजूला लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले जात असताना, दुसऱ्या बाजूला त्याच पैशांच्या वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आल्यामुळे कांद्याचे दरही घसरले असल्याचा मुद्दा आ. पाटील यांनी मांडला. त्यांनी हेही अधोरेखित केले की, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे आश्वासन महायुती सरकारने पूर्ण केले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले. यावेळी उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, हनुमंत आव्हाड, रामलिंग आव्हाड, तुषार वाघमारे, रामहरी बाप्पा मुंडे, नेताजी जावळे, भारत नाना सांगळे, सागर बाराते,संदीप पायाळ, सुनील पाटील, श्याम देशमुख, प्रशांत धोंगडे, कांबळे सर, खंडू भातलवंडे, अनिल पवार, चरण पाटील मारुती देशमुख सर, राहुल पाटील, बालाजी भातलवंडे, विलास तात्या थोरबोले, समाधान बाराते, दिलीप बाराते, अक्षय बाराते, भाऊसाहेब ताकमोगे, उमेश बाराते आदीसह नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी