तानाजीराव आता पुन्हा एकदा आमदार होतीलच; त्यांना नामदार करण्याची जबाबदारी माझी!
*परंडा येथे सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची विराट सभा
*सावंत यांच्या कामाचे मुख्यमंत्र्यांकडून तोंड भरून कौतुक
परंडा: भूम-परांडा-वाशी या मतदारसंघाचा ३५ वर्षांचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम तानाजीराव सावंत हे करत आहेत, हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भरउन्हातील तुमची ही गर्दी त्यांच्या विजयाची खात्रीच देत आहे. तानाजीराव पुन्हा एकदा आमदार होतीलच, त्यांना नामदार करण्याची जबाबदारी माझी आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे प्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. परांडा येथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. तर, आपण तत्वाचं राजकारण करतो. नैसर्गिक युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर या मतदारसंघातील विकासकामांना गती मिळाली. दोन हजार कोटींचा निधी या मतदारसंघात आणून विकास घडविला. विकासाची ही प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्यासाठी पुन्हा एकदा विधानसभेत पोहोचायचे आहे. गुलाल आपलाच आहे, आणि तो आपल्याला २३ तारखेला उधळायचा आहे, असे याप्रसंगी सांगून प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन उपस्थित जनसमुदयाला केले.
परंडा येथील कोटला मैदानावर भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), रिपाइं व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री व महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा माजी आमदार पाशा पटेल, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, जिल्हा समन्वय गौतम लटके, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय बनसोडे, भाजपचे विधानसभा निवडणूक समन्वयक बाळासाहेब क्षीरसागर, माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर, रिपाइंचे सरचिटणीस संजयकुमार बनसोडे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चनाताई दराडे, उपजिल्हाप्रमुख दत्ता मोहिते, शिवसेना नेते संजय गाढवे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, भाजप जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, भैरवनाथ शुगर वर्क्स वाशीचे कार्यकारी संचालक केशव सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, बाळासाहेब मांगले, भूमचे शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, वाशी तालुकाप्रमुख अॅड. सत्यवान गपाट, वाशी शहराध्यक्ष संजय पवार, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष परांडा तालुकाप्रमुख बालाजी नेटके, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, नीलेश शेळवणे, दत्ता काळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख पांडुरंग धस, प्रमोद शेळके, युवा आघाडी तालुकाध्यक्ष प्रवीण गायकवाड, विधानसभा समन्वयक नागनाथ नाईकवाडे, महिला आघाडी वाशी तालुकाप्रमुख आलकाताई भालेकर, वाशी शहराध्यक्षा ललिताताई जगताप, नगरसेवक शिवहार स्वामी, वाशी उपतालुका प्रमुख विकास तळेकर, गणप्रमुख अशोक लाके, गणप्रमुख विलास खवले, कुंडलीक आखाडे, पोपट सुखसे, वाशी शहर प्रमुख सतिश शेरकर, भाजपचे भूम तालुकाध्यक्ष महादेव वाडेकर, भूम तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, भूम शहराध्यक्ष बाळासाहेब वीर आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मतदारसंघात दोन हजार कोटींचा निधी आणण्यासाठी व विकासकामे करण्यासाठी मनगटात बळ लागते, अशा शब्दांत प्रा. तानाजीराव सावंत यांच्या कामाचा गौरव करत, मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, की भरउन्हातील तुफान गर्दी पाहून ही विजयाची सभा असल्याचे वाटते आहे. तुम्ही तानाजीराव सावंत यांना मतदान करा, २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळायला आपण पुन्हा येथे येऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. धाराशिव हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे. काहींनी बाळासाहेबांचा धनुष्यबाण अनैसर्गिक युती करून काँग्रेसकडे गहाण ठेवला होता. बाळासाहेबांनी कमावलेल्या धनुष्यबाणाची आण, बाण आणि शान आम्ही जपली. आम्ही उठाव केला आणि बाळासाहेबांच्या विचारांशी प्रमाणिक राहिलोत, असेही याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी नीक्षून सांगितले. शिवसेना आमची आहे, असे सांगणार्यांनी हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आंदण दिला आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. आमच्या अडिच वर्षात आम्ही केलेली कामे बघा, आणि त्यांच्या काळातील कामे बघा. ते सत्तेवर आले आणि प्रकल्प बंद केले. परंतु, आम्ही उठाव करून सत्ता हातात घेतली आणि बंद केलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. तानाजीराव सावंत यांनी आरोग्य मंत्रीपदाच्या काळात क्रांतीकारी काम केले. त्यांच्या कामाची तर ‘गिनीज बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे, असे सांगून, मुख्यमंत्री शिंदे यांनी तानाजीराव सावंत यांच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले. आमचे सरकार हे देणार्यांचे सरकार आहे. मी स्वतः गरीब शेतकरी कुटुंबातून आलो आहे, त्यामुळे दीड हजार रूपयांची किंमत मला माहिती आहे, ती त्या तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना कळणार नाही. लाडक्या बहिणींच्या जीवनात आनंद निर्माण करणारे हे सरकार आहे. आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना दीड हजार रूपये दिले तर त्यांच्या पोटात दुखले. ही योजना बंद करण्यासाठी त्यांनी कितीही आटापिटा केला तरी आम्ही लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. उलट या बहिणींचे मानधन दीड हजार रूपयांवरून २१०० रूपये आम्ही करणार आहोत. लाडक्या बहिणी, शेतकरी यांच्यासाठी योजना राबविण्यास, त्यांना आधार देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. पुन्हा सत्तेवर आलो तर शेतकर्यांचे कर्जमाफ करणार आहोत, असेही याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. तानाजीरावांचा नाद कुणी करायचा नाही. ते जादूगार आहेत. प्रेमानं माणसं जिकणं, आणि माणसांना जीव लावणं हे त्यांना जमतं. ही भरउन्हातील गर्दी पाहून तुम्ही त्यांना आमदार केलेच आहे, आणि त्यांना नामदार करण्याची जबाबदारी माझी आहे, असेही याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तर मला मंत्रिपद फक्त दोन वर्षे मिळाले तर इतकी मोठी कामे झाली आहेत. आपण तत्वाचं राजकारण करतो, त्यालाच ठेच पोहोचली होती, म्हणून उठाव करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. या मतदारसंघाचा कायापालट करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे हा सर्व विकास होऊ शकला. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असून, आपल्याला विकासाची ही गती अशीच कायम ठेवायची आहे, त्यासाठी २० तारखेला हातातील सर्व कामे बाजूला ठेवून धनुष्यबाणालाच मतदान करा, असे आवाहन याप्रसंगी प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी यावेळी केले. यावेळी परांडा, भूम, वाशी तालुक्यांतील महिला, पुरूष, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.