धाराशिव येथे देवदत्त मोरे यांच्या हस्ते महिला, तरुणींसह युवकांचा मनसेत प्रवेश
धाराशिव: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे यांनी उस्मानाबाद -कळंब विधानसभा मतदार संघात जोरदार प्रचार सुरू केला आहे. मोरे यांच्या उमेदवारीमुळे मनसेचे ‘इंजिन’ वेगाने धावत असून पक्षात ‘इनकमिंग’ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धाराशिव शहरातील तांबरी विभाग येथील महिला, तरूणींसह युवकांनी देवदत्त मोरे यांच्या हस्ते मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला.
धाराशिव येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी वंदना डोलारे, सुनिता विधाते, आशा विधाते, देवई विधाते, छापा हावळे, रेखा विधाते, नेहा कांबळे, दिशा सुरते, निलाबाई पेठे, शितल पारंडे, कल्पना कांबळे, प्रिया गायकवाड, कांचन ओव्हाळ, अंकिता गायकवाड, पूजा देडे, अनिशा डोलारे, राजेश विधाते, प्रकाश कांबळे, सुजित ओव्हाळ यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेचे उमेदवार देवदत्त मोरे यांनी महिला, तरूणींसह युवकांचे सत्कार करून पक्षात स्वागत केले.
.