उस्मानाबाद मतदारसंघात मनसेचे ‘इंजिन’ ही सुसाट; उमेदवार देवदत्त मोरेंकडून प्रचार यंत्रणा टाईट.!
*शेकडो तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश
कळंब: उस्मानाबाद-कळंब मतदार संघात वर्चस्वाची लढाई सुरू आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये राजकीय कुस्ती होत आहे. आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार देवदत्त मोरे यांनीही उडी घेतली आहे. श्री मोरे यांनी मतदार संघातील विविध गावात जाऊन प्रचार यंत्रणा कामाला लावली आहे. धाराशिव शहरासह कळंब येथेही संपर्क कार्यालय सुरू केले असून शेकडो कार्यकर्ते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत दाखल होत आहेत. त्यामुळे ‘धनुष्यबाण’, ‘मशाली’ सह ‘इंजिन’ ही निवडणुकीच्या आखाड्यात जबरदस्त धावत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील कळंब शहरातील कल्पना नगर येथील असंख्य तरुणांनी उमेदवार देवदत्त भागवत मोरे यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला. श्री मोरे यांच्या नेतृत्वावर आणि कर्तुत्वावर विश्वास ठेवून तरुणांनी मनसेमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले. तर मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिन या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन उमेदवार देवदत्त भागवत मोरे यांनी तरुणांसह महिला व ग्रामस्थांना केले. श्री मोरे यांनी शहरी भागासह ग्रामीण भागात प्रचार यंत्रणा राबविली असून ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. कळंब शहरातील कल्पना नगर भागातील गोपाल घोगरे, अंशू कसबे, किशन मचाले, आकाश भंडारे, कुंदन कदम, बापू मोरे, आकाश कदम, ऋषी महाजन, लाला डिकले दादा यादव, रामेश्वर थोरात, तेजस लोकरे, सुधीर सुतार, मोन्या सावंत, बबलू सौदागर, किशोर निकम, सागर राऊत, प्रवीण मडके, निलेश जगताप, निखिल अंधारे, आकाश अंधारे, विनोद जगताप, अमोल जगताप, प्रशांत डोईफोडे, सनी गायकवाड, शुभम जोशी आदींसह असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसेचे उमेदवार देवदत्त मोरे यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला.