Monday, December 23, 2024

Epaper

spot_img

उमरगा-लोहारा मतदारसंघाचा विकास गतिमान राहण्यासाठी साथ द्या- आ‌. ज्ञानराज चौगुले 

उमरगा-लोहारा मतदारसंघाचा विकास गतिमान राहण्यासाठी साथ द्या- आ‌. ज्ञानराज चौगुले

माळेगाव येथे गाव भेट दौरा
महायुतीचे उमेदवार चौगुले यांचा झंझावात सुरू
उमरगा: महायुती सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घटकाचा विकास व्हावा या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजनेच्या माध्यमातून राज्यभरात कोट्यावधी माता-भगिनींना सक्षम आणि आत्मनिर्भर होण्याचे नवे दालन खुले झाले आहे. हा विकास असाच गतिमान रहावा, यासाठी शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा द्यावा, असे आवाहन विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
लोहारा तालुक्यातील माळेगांव येथे शिवसेना महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी भेट दिली. तसेच माता-भगिनी व ग्रामस्थांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आ. चौगुले म्हणाले, राज्यात महायुती सरकारने अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी माता-भगिनींना थेट आर्थिक लाभ देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विज बिल माफी करण्यात आली आहे. सुशिक्षित बेरोजगारांना मानधन देण्यात आली असून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे. शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांमध्ये विमा भरण्याची सवलत देऊन सरकारने दिलासा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना लागू करून वंचित, गोर-गरीब नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले आहे. उमरगा-लोहारा मतदारसंघात शासनाकडून कोट्यावधी रुपयांची विकास कामे मंजूर करून आणली. तसेच न्यायालयासह विविध इमारती उभारलेल्या आहेत. सिमेंट रस्ते, गटारी, सार्वजनिक सभागृह, विद्युतीकरण, डांबरी रस्ते, विद्युत डीपी, देवस्थान परिसरात विविध कामे आदींसह गावोगावी विकास कामाची गंगा पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे यापुढेही मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भरघोस मताधिक्यांने विजयी करावे, असे आवाहन महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांनी केले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, आप्पासाहेब पाटील, सरपंच वैभव पवार, माजी सरपंच प्रकाश गर्जे, अशोक आनंदराव पाटील, श्याम केशव पाटील, शहाजी गर्जे, इंद्रजीत पाटील ,हरिदास पवार ,हरिदास लक्ष्मण पवार ,अमोल पाटील ,मनोज पवार ,श्रीधर गर्जे ,शरद कुंभार, कालिदास पवार, अनिल जांभळे, शाहूराज सूर्यवंशी ,रत्नदीप मुरमे, तात्याराव गर्जे, तुकाराम गर्जे, रमेश सूर्यवंशी, तुकाराम गर्जे, तुकाराम कदम, योगेश गर्जे, दिनकर पवार, अंकुश भोकरे, शिवराम गोरे, सुमित एकंबे, गजराबाई शिरगिरे, सुलाबाई पवार, बेबाबाई गुंड, सुनीता गुंड, नालंदा सुरवसे, भागाबाई मुरमे, अनिता शिरगिरे, कोंडाबाई मुरमे, सुनिता सूर्यवंशी, भागाबाई कुंभार, उज्वला सुरवसे, फुलाबाई पवार ,सुंदराबाई गुंड ,कलावती पाटील, चंपाबाई सुरवसे, सुमनबाई कदम, सुकुमार गोरे, रंजना पाटील ,शांताबाई पाटील ,उक्काबाई जांभळे ,अश्विनी यादव,किरण यादव आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

आणखी वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

चालू घडामोडी