*महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांचा झंझावात सुरू; गाव भेट दौऱ्यांना मोठा प्रतिसाद*
उमरगा: महायुतीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा-लोहारा मतदार संघात झंझावती दौरे सुरू केले असून त्यांच्या गाव भेट दौऱ्यांना मोठा प्रतिसाद भेटत आहे. गत १५ वर्षात मतदार संघात केलेल्या विकास कामाच्या जोरावर आणि जनतेच्या कायम संपर्कात राहिल्यामुळे मतदारसंघात त्यांची ‘क्रेझ’ पहावयास मिळत आहे.
विलासपूर पांढरी येथे आ. चौगुले यांनी गाव भेट दौऱ्यानिमित ग्रामस्थांशी संवाद साधला. मागच्या १५ वर्षांमध्ये आमदार म्हणून केलेल्या विकासकामांचा लेखाजोगा तसेच पुढील पाच वर्षांमधील करावयाच्या कामांचे व्हिजन आमदार चौगुले यांनी जनतेसमोर मांडले. मागच्या १५ वर्षांमध्ये केलेली विकासकामे, जनतेसाठी कायम राहिलेली उपलब्धता आणि सभागृहात 100% उपस्थित राहत जनहिताच्या विषयांची केलेली मांडणी यामुळे जनता पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने मला आशीर्वाद देईल असा विश्वास आ. ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी सरपंच मारुती कार्ले, उपसरपंच अशोक जांभळे, तंटामुक्त अध्यक्ष पंडित गुरुजी कार्ले, चेअरमन गजेंद्र बिराजदार, बसवेश्वर कार्ले, अशोक जांभळे, किसन घोत, श्रीकांत पाटील, देवाप्पा भुजबळ, निळकंठ कासेगावे, किसन जांभळे, महादेव जायफळे, दगडू बिशे ,किसन जांभळे, तानाजी बिराजदार, दत्तू कार्ले, परमेश्वर कार्ले, पिंटू औरादे, शशिकांत पाटील, विठ्ठल जांभळे, गुलाब बिशे, मारुती पाटील, अनिल बिराजदार ,धनराज कार्ले, समाधान कार्ले , अविनाश कासेगावे, गुरुदास पाटील, बसवराज कार्ले, भीमा मुळे, शंभू देडे, ब्रह्मानंद कार्ले, पप्पू पाटील, मधुकर बिराजदार, डिगू आळंगे, संतू पवार, बसवेश्वर जायफळे, राजेंद्र माळी आणि यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुका प्रमुख जगन्नाथ पाटील, आप्पासाहेब पाटील यावेळी युवक, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.